संपादक-२०१४ - लेख सूची

अंधश्रद्धानिर्मूलनाची एक गोष्ट

घराची बरीच दुर्दशा झालेली असताना दुरुस्ती व देखभालीचे काम काढायचे ठरले. ठेकेदार मिश्रीलाल ह्यांना ठेका देण्यात आला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी, दोन लेबर बाजूच्या सर्वंट क्वार्टरमध्ये आणून ठेवतो असे आम्हाला सांगितले व त्याबरोबरच हेही बजावले, की त्या लेबर लोकांना काहीही द्यावयाचे नाही. ते स्वतःची व्यवस्था करून घेतील. तुम्हाला कटकट नको म्हणून आधीच सांगतो. किशोर, ललिता व …

संपादकीय

जनुक – संस्कारित अन्न किंवा जेनेटिकली मॉडिफाईड फूड (जीएम अन्न) ह्या विषयावरील हा विशेषांक ‘आजचा सुधारक’ च्या वाचकांपुढे सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. आजच्या माध्यमांच्या भाऊगर्दीत व त्यात खेळल्या जाणाऱ्या विवादांच्या गदारोळात ‘आजचा सुधारक’मध्ये विविध प्रासंगिक विषयांवर वडणाऱ्या वैचारिक विमर्शाचे स्थान आगळेवेगळे आहे. संपादक व लेखक आपापल्या वैचारिक भूमिकेशी प्रामाणिक राहूनही खुलेपणे विचारांचे …

शृंखला पायी असू दे, मी गतीचे गीत गाई

“तुम्ही तुमच्या शब्दांनी मला जखमी करा डोळ्यांनी माझे तुकडे तुकडे करा तुमच्या द्वेषाने मला ठार मारा पण हवेतून वर मी परत उभी राहीन” ती आठ वर्षाची होती तेव्हाच तिने बोलणे टाकले. त्याच वर्षी तिच्या आईच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला होता. तिच्या पोटातील तीव्र यातना, रक्त, खटकन्, ऊसकलेली तिची कंबर, या पेक्षा तिला सर्वात भयानक जाणीव …

दहशतवादी राजवटीचे निकष

सिग्मंड फ्रॉइड हे एक थोर मानसशास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी केलेल्या मनोविश्लेषण नावाच्या मांडणीला ह्या शास्त्रात विशेष महत्त्व आहे. परंतु त्यांनी केलेल्या राज्यशास्त्रावरील लिखाणाहीकडेही आता भारतातच नव्हे तर जगभरात गांभीर्याने पाहिले जात आहे. राजकीय प्रक्रिया ह्या विषयांवरील त्यांचे निबंध आता फ्रॉइड आणि मूलतत्त्ववाद ह्या नावाने पुस्तकरूपाने उपलब्ध आहे. आपला काळ अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी ती …